मी आणि कोपऱ्यातला कंदील …

कोणाला काही मागून कधी मिळतं थोडंच ! तिच्याच्याने हे देखील होत नाही. मग काय करणार … रात्रीचे जागे रहाण्याचे सत्र सुरु होते आणि मग नाना तऱ्हेचे विचार मनामध्ये येऊ लागतात. मन खूप वेगवेगळ्या वाटांवरून चालून बघते, थोडं डोकावून बघते पण कोणीच दिसत नाही. तेव्हा मात्र भरपूर लोकांनी वेढलेले असूनही एकाकी असणं म्हणजे काय ? याची…

बंगला !

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खरं तर मन किती प्रयत्न करतं. प्रयत्न करतं म्हणजे त्याच्या परीने जेवढं करता येईल तेवढं करत असतं. मजेची गोष्ट अशी की तेवढं ही पुरं पडत नाही. ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तेव्हा मनाला प्रश्न पडतो की असं का झालं ? मी कुठे कमी पडलो ? याचं उत्तर शोधायला गेलं की जाणवतं की…

तर..

माणूस बऱ्याचदा निराश झाला , अपयशी झाला की त्याला स्वतःच्या परिस्थिती बद्दल वाईट वाटत असतं. मग तो जगाला, नशीबाला, नियतीला आणि विशेष म्हणजे लोकांच्या नाशीबांना नावं ठेवतो. पण खरं तर दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा माणसाने आपले नाकर्तेपण मान्य केलं पाहिजे, आपण आपल्या परिस्थितीचे दास आहोत हे मान्य केलं पाहिजे .. आणि दासांना स्वतःच्या इच्छा नसतात, आकांक्षा…

ही वाट अशीच जाते

आयुष्य एक प्रवास आहे हे आपल्याला माहित असले तरी सुद्धा या प्रवासात आपण अनेक परिक्रमा पार करत असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्पा खर तर एका परिक्रमेचा शेवट आणि दुसऱ्या परिक्रमेची सुरुवात असते. या परिक्रमा करत असताना आपण वेगवेगळ्या भूमिका घेत असतो. माणसाच्या मनाला त्याची भूमिका माहित असली की प्रवास सुकर वाटतो. पण कधी कधी आपली भूमिका…

रोज रात्री

माझ्या आयुष्याचे एक एक टप्पे पार करत असताना मला बरेचदा अनेक प्रश्न पडतात. दिवसा मन आपापल्या कामात व्यस्त असतं त्यामुळे हे प्रश्न पडत नाही. पण जशी जशी संध्याकाळ जाऊन रात्र येऊ लागते तसतसे हे प्रश्न उजळत जातात. आणि प्रश्न रात्र नेहमी घेऊन येते. मला नेहमी गम्मत वाटते हे प्रश्न रात्रीच का पडतात. हळू हळू ही…

एवढंच

आता हे तर नक्की झालंय की रात्र येतेच आणि ती आली की लवकर जात नाही. मी रात्रीला जा तर म्हणू शकत नाही. पण तिच्या येण्याने मनाच्या शांत पटलांवर काही तरंग उठतात हे मात्र नक्की. आणि हे तरंग कधी कुठल्या गोष्टी स्वतः बरोबर वाहून आणतील याचा एम नाही. या गोष्टींवर हसावं की रडावं याचा विचार सुरु…

अबोली

(काल्पनिक) बालपणीच्या आठवणी मनावरून कुणालाच सहसा पुसून टाकता येत नाहीत. काही काही आठवणी जशा नाजूक तशा काही व्यक्तीही नाजूक असतात. अशीच एक आठवण माझ्या मनात गेली कैक वर्षे घर करून आहे. ती माझ्या घरासमोर रहायची, जेमतेम माझ्याच वयाची. पण ती खेळकर होती, गोंडस होती आणि विशेष म्हणजे फक्त माझ्याशीच खेळायची. तिचा लाडका खेळ भातुकली. माझ्या…

हे राष्ट्र महान आहे!

नाकर्तेपण एक असा शाप आहे जो कोणालाच पचत नाही. आपण नाकर्ते आहोत ही कल्पना देखील मनाला मुळापासुन हादरवून सोडते. आजच्या जगामध्ये (ऐहिक जगामध्ये ) जेवढं नाकर्ते पण आहे तेवढं माणसाने कधीच पाहिलं नव्हतं ! असं गेली अनेक वर्षे अनेक जण सांगत आलेले आहेत. आजही सांगत आहेत.. म्हणजे परिस्थिती बदललेली नाही. कोणी बदलायला गेलाच तर त्याच…

तो थकला होता थोडा!

माझी ही उत्तरं शोधण्याची प्रक्रिया जरी परिचयाची असली तरी ती सोसायला सोपी नव्हे. पण याचा भौतिक जगात काहीही उपयोग नसतो कारण माझ्या उमेदीचा काळ निघून गेलेला असतो, आपलं मनाचं समाधान.. इतकंच. नुसत्या मनाच्या समाधानावर पुन्हा एकदा उमेदीने शोध सुरु करणं म्हणजे तसं कठीणच! तेव्हा माझ्यातच एक नवीन मूक संघर्ष सुरु होतो, एका बाजूला माझं मन आणि एका बाजूला…

फकीर

या माझ्या चालण्या, थांबण्या अडखळण्याच्या परिक्रमेतील अजून एक पडाव म्हणजे फकिराचं कोंदण लाभलेलं क्षणिक वैराग्य. खरं तर वैराग्याचा अर्थ फार मोठा आहे. त्याच्या अनंत पसरलेल्या पाउलखुणांवर वर्षानुवर्ष साचत आलेल्या अध्यात्मिक भस्माला माझ्या सारख्या सामान्य माणसाचा उसासा काय हलवणार? संसारावर, आयुष्यावर प्रेम करायचं असेल तर एकदा तरी वैराग्याची भावना दाटून यावी लागते एकदा तरी फकिराचे फाटके…