हे जननी जन्मभूमी

तू अभंग कारुण्यमूर्ती
तू रवी दिव्यसम स्फूर्ती
तू पतित पावन गंगा
सागराची अमर्त्य उर्मी
हे जननी जन्मभूमी

सुफला वरदा तू धरिणी
तृणसमान स्वर्ग या चरणी
विश्वमुकुटी तू राजमणी
तव गाऊ कशी आरती मी
हे जननी जन्मभूमी

हे माते मंगलदायिनी
देवी शौर्यरत्न धारिणी
कर जोडून तुज वंदितो
मनमंदिराच्या धामी
हे जननी जन्मभूमी

तव नाम जणूकी स्तोत्र
धुलीकणही पूज्य पवित्र
स्तुती काव्य हे अणूमात्र
तू त्रिलोक नाथ स्वामी
हे जननी जन्मभूमी

– रोहित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *