पाचोळा

दिवा लावला की प्रकाश पडणार ! एवढ्या साध्या आणि सुलभ व्याख्येने वादळ आणि त्याच्या परिणामांचे मुल्यांकन करता येत नाही. मनातल्या वादळांची तर गोष्टच निराळी ! मनातलं वादळ म्हणजे फक्त सोसाट्याने वाहणारे विचार किंवा बेभान बरसणाऱ्या भावना नसतात. ते वादळ म्हणजे जीवनरूपी अखंड नदीचा प्रवाह बदलणारा, नैसर्गिक बांध असतो. प्रवाहात वाहताना मनाला दिशांचे भान रहात नाही. त्याला…

मलाही हसायचंय

सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .. असं थोरा मोठ्यांचं बोलणं आपण वाचतो , ऐकतो. ज्याच्यासाठी सुख-दुःखातला फरक नष्ट झाला तो स्थितप्रज्ञ हेही आपण मानलेलं आहे. पण स्थितप्रज्ञही स्वतःला आपण सुख-दुःखाला समान मानतो , असं सांगून स्थितप्रज्ञतेच एका अर्थी सुखच उपभोगत असतो ! मग हा फरक कुठे नष्ट झाला ?! याच मुख्य कारण…

तू गेलीस त्या वाटेवर..

कलाकाराला मिळणारा एकांत म्हणजे एक दुधारी तलवार असते .. तो एक मोहपाश असतो ज्याचा मोह सुटत नाही आणि एकदा अडकलो की पुन्हा भौतिक जगात यावस वाटत नाही. एकांत म्हणजे फक्त आजूबाजूला कोणी नसणे नव्हे ही तर एक मनाची अवस्था असते जेव्हा माणूस अंतर्मुख होत असतो. या एकांताची कारण शोधायची असतील तर आधी मनात वाकून पहाव…

काल

प्रेमाच्या पाकळ्या वेचत वेचत माणूस कुणाचा तरी माग काढत ज्या रस्त्यांवरून चालत असतो , ते रस्ते तसे नागमोडी वळणांचे … ओंजळीत साठवलेल्या पाकळ्या हळू हळू सुकून जाऊ लागतात आणि त्यांच्या गंधांच्या आठवणी होऊ लागतात. या तथाकथित प्रेमाच्या अनिश्चित वाटांवर चालताना एका सहचारिणीचा  विसर पडलेला असतो ती म्हणजे वेळ. पावलागणिक लांब आणि धूसर होत जाणाऱ्यां रस्त्यांना…

दूरदेशीच्या पाखरा

हिशेब ही सुद्धा अजून एक अशीच मजेशीर गोष्ट! कारण हिशेबाचा संबंध गणिताशी येतो.. एका अस्सल भौतिक विश्वाशी येतो. या जगात दोन अधिक दोन चारच होतात, ते जर झाले नाहीत तर हिशेब चुकला हे अगदी नक्की. आयुष्याचा हिशेबासाठी चालू असलेली जुळवाजुळव म्हणजे थोडक्यात आनंदाच्या क्षणांतून दुःखांच्या क्षणांची वजाबाकी. बहुतेकांच्या नशिबात या हिशेबाची बाकी शून्य असते. थोडक्यात आपल्या…

काही गोष्टींना खरच “वय” नसतं!

माझ्या भावनाच्या काही विचित्र अवस्था आहेत.. आधी प्रश्न, मग त्याचं उत्तरं शोधण्याची धडपड, मग थोडे मी आणि थोडे लोकांनी उभे केलेले अडथळे, त्यावर येणारा राग, फार राग येऊन होणारा निरुपाय, निरुपायाने ओढवलेली शांतता आणि कालांतराने प्रश्नच निष्फळ वाटू लागल्यामुळे येणारं करुणात्मक हसू आणि एकदा एखाद्या गोष्टीच हसं झालं की त्याकडे मी त्रयस्थ पणे बघतो आणि खरा प्रश्न समोर…

मागणं

हे जरी खरं असलं तरी माझं भावनाकाहूर मन? ते त्याच्या प्रश्नांना उत्तरं मागत असतं. अशा वेळी माणसाला हे जाहीर करावं लागत की तो नास्तिक नाही! एकदा आस्तिक झालं की सगळं देवावर सोपवायला मोकळीक मिळून जाते. तरीही काही झाडे वादळाला झुंजायला तयार होतात, उभी राहतात. काही झाडांच्या फांद्या तुटतात, काहींची फुले वाहून जातात तरीही झाडं उभी…

सार्थक

देवाकडे केलेलं मागणं म्हणजे सरकारी साहेबाला केलेला अर्जच! सगळ्यांना वाटतं की त्यांच मागणं महत्वाचं आहे.. स्वार्थाचा चष्मा थोडा वेळ बाजूला केला तर गीतेतला एक दृष्टांत दिसू लागतो, तो म्हणजे प्रत्येक जीवाचा जन्म एका निश्चित कर्मासाठी झालेला आहे. हे कर्म झाले नाही तर मोक्ष मिळत नाही या भीतीपोटी माणूस आत्महत्या टाळत असतो. याच भीतीपोटी तो आपापले…

साजणवारा

मी जर जन्म आणि मृत्यू यांच बोलू लागलो तर लोकं म्हणतील गतजन्म आणि पुनर्जन्मावर आमचा विश्वास नाही. हे सगळे माणसाच्या मनाचे खेळ !… पण माणसाचं मन खरच कुणाला उलगडलय का हो ?! माणसाचं मन म्हणजे एक साध सरळ आणि सोप चक्रव्यूह आहे. मनात अडकून पडलेला माणूस असो किंवा माणसात गुंतलेल मन असू दे , त्याचे…

संध्याचर

एकदा एखादी गोष्ट भावली की ती बदलू नये असं वाटण यात मात्र माणसाचा स्वार्थ नसतो … ती एक भीती असते कारण तीच गोष्ट जर निराळच वस्त्र , चेहरा घेऊन आली तर त्याचे स्वागत कसे करावे कळत नाही. कदाचित ते नवीन रूप स्वागत करण्याजोग ही नसू शकत ! तेव्हा असं वाटत की मोहक संध्येची सवय का…